Lokmat Agro >हवामान > Marathwada Rain update : काय आहे आजचा हवामान अंदाज?

Marathwada Rain update : काय आहे आजचा हवामान अंदाज?

Marathwada Rain update : What is today's weather forecast? | Marathwada Rain update : काय आहे आजचा हवामान अंदाज?

Marathwada Rain update : काय आहे आजचा हवामान अंदाज?

Marathwada Rain update : मराठवाडयाचा आजचा हवामान अंदाज काय ते पाहुया.

Marathwada Rain update : मराठवाडयाचा आजचा हवामान अंदाज काय ते पाहुया.

शेअर :

Join us
Join usNext

Marathwada Rain update :  राज्यात पावसाचा जोर दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने ७ ऑगस्ट रोजी मराठवाडयाचा हवामान अंदाज दिला आहे. 
प्राप्त झालेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 कि.मी. अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. 
मराठवाडयात दिनांक 08 ते 10 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसणार आहेत. तर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाडयातील इतर जिल्हयात पाऊस विश्रंती घेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाडयात दिनांक ०९ते १५ ऑगस्टदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तर दिनांक ११ ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी सल्ला 
शेतक-यांनी पिकात अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रीत करून घ्यावे व खत मात्रा दिली नसल्यास खतमात्रा दयावी. पिकावरील किडीच्या व्यवस्थापनासाठी फवारणीची कामे करून घ्यावीत. अशी शिफारस वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने केली आहे.

Web Title: Marathwada Rain update : What is today's weather forecast?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.