राज्यात आज सर्वदूर मुसळधार पावसाची शक्यता देण्यात आली असून मराठवाड्यात आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट व मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, दिनांक 23 जून रोजी छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात बऱ्याच ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 40 ते 50 कि.मी.) राहून मूसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही व किमान तापमानात पुढील दोन दिवसात 2 ते 3 अं.से. ने घट होऊन त्यानंतर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ जूनपर्यंत मराठवाड्यात पाऊस सरासरीएवढा ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.