Marathaada Weather Update : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. आज मराठवाड्याची हवामानाची स्थिती काय असेल? वाचा सविस्तर
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहे. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा घसरला असून थंडीचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवसांत थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मागील मराठवाड्यात आठवड्यात अवकाळी पाऊस झाला. आता आकाश निरभ्र राहणार असून पावसाची कोणतीही शक्यता वर्तविण्यात आली नाही. रात्री आणि पहाटे थंडीचा जोर वाढला असून काही ठिकाणी पारा १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात मोठी घट झाली आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १२ अंश सेल्सिअस इतके असणार आहे. शहरात सकाळच्या वेळी धुके वाढले असून येत्या काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मराठवाड्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. मंगळवारी (१९ नोव्हेंबर) रोजी परभणी जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. परभणीमध्ये किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे राहिले. तर धाराशिव, नांदेड, लातूर या जिल्ह्यांत किमान तापमान १६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले.
हिंगोली, बीड आणि जालना या जिल्ह्यात देखील किमान तापमान आहे १६ अंश सेल्सिअस असून तापमानामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे. दिवसा थंड वारे वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कापाटात ठेवलेले गरम कपडे आता बाहेर काढले आहे.
तापमानात झपाट्याने घट होत असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची आणि फळबागांची देखील काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
पाच दिवस हवामान कसे?
प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार मराठवाड्यात पुढील पाच आकाश दिवसांत स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज 'वनामकृ' विद्यापीठाच्या हवामान विभागाने वर्तविला आहे.
मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने घट होऊन त्यानंतर हळूहळू १ ते २ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडी जाणवत आहे. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.