Join us

Marathwada weather update: छत्रपती संभाजीनगरसह कोणत्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस?

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 17, 2024 2:49 PM

प्रादेशिक हवामान केंद्राने काय सांगितलं? वाचा

राज्यात मान्सूनला सुरुवात झाली असून मराठवाड्यात ३ ते ४ दिवस जोरदार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला असून आज दि १७ जून रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर,धाराशिव व नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

प्रादेशिक हवमान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ३० ते ४० किमी प्रतितास राहणार असल्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी केंद्राने प्रसिद्ध केली आहे.

आज २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसचा यलो अलर्ट ( Maharashtra yellow Alert today) देण्यात आला असून इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठवाडा- छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर,धाराशिव जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.

टॅग्स :मोसमी पाऊसपाऊसहवामानमराठवाडा