Join us

Mhaisal Lift Irrigation Scheme : म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप १० जानेवारीपासून सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:10 IST

Mhaisal Lift Irrigation Scheme सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून सिंचन योजना सुरू करण्याची मागणी होत आहे.

सांगली : जिल्ह्याच्या पूर्व भागात पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून सिंचन योजना सुरू करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत पाटबंधारे कार्यालयात म्हैसाळ सिंचन योजनेचे पंप सुरू करण्याबाबत आढावा बैठक झाली.

त्यात दि. १० जानेवारीपासून योजनेतील २३ पंप सुरू करण्याचा निर्णय झाला. सांगोला, जत, कवठेमहांकाळ, मिरज, तासगाव तालुक्यांतून पाण्याची मागणी आहे.

म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील पाटबंधारे कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार सुरेश खाडे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, ज्योती देवकारे, ए. व्ही. रासनकर, आदी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये दुष्काळी भागातून पाण्याची मागणी असल्यामुळे सुरेश खाडे म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी खाडे यांनी केली होती. त्यानुसार चंद्रशेखर पाटोळे यांनी म्हैसाळ योजना सुरू करण्यात येणार असून, आठशे क्युसेकने पाणी देण्यात येणार आहे.

हे पाणी मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, मंगळवेढा, सांगोला तालुक्यास देण्यात येणार आहे. रब्बी ज्वारीस पाणी देण्याची गरज निर्माण झाल्याने शेतकऱ्यांतून पाण्याची मागणी वाढत आहे.

जिल्ह्याच्या पूर्व भागात बागायती क्षेत्र वाढले आहे. पाणी कमी पडत असल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे या योजनेद्वारे तलाव भरून घेण्याचे नियोजन केले आहे.

अधिक वाचा: Sugarcane FRP : यंदा उसाचा तुटवडा; ऊस मिळविण्यासाठी कारखान्यांत वाढीव ऊसदर देण्याची स्पर्धा

टॅग्स :पाटबंधारे प्रकल्पपाणीशेतीशेतकरीपीकसांगलीरब्बीटेंभू धरण