धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात सोमवारी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. मकरसंक्रांतीच्या दिवशी माकणी परिसरात सायंकाळी ५:२३ वाजण्याच्या सुमारास २.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा- अरबी समुद्रात भूकंपाचे धक्के! ४.१ रिश्टरची तीव्रता
लोहारा तालुक्यातील माकणी, सास्तूरसह परिसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. सोमवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सायंकाळी ५:२३ वाजण्याच्या सुमारास माकणीसह परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला. दरम्यान, या भूकंपाची दिल्ली येथे २.३ रिश्टर स्केल एवढी नोंद झाली असल्याची माहिती कुलाबा मौसम विभागातील मौसम वैज्ञानिक (अ) किरण नारखेडे यांनी 'लोकमत'ला दिली. या धक्क्यामुळे १९९३ साली झालेल्या प्रलंयकारी भूकंपाच्या आठवणी जाग्या झाल्या.
हेही वाचा- पालघरमधील तलासरी,डहाणू तालुक्यात भूकंपाचे हादरे, नागरिकांमध्ये घबराट
या गावांना बसला धक्का लोहारा तालुक्यातील माकणीसह खेड, करजगाव, धातुरी आणि चिंचोली काटे या गावांना सोमवारी सांयकाळी ५:२३ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याचे ग्रामस्थांनी 'लोकमत'ला सांगितले.
पालघरमध्येही नुकताच भूकंप
पालघर जिल्ह्यातील तलासरी, डहाणू तालुक्यात पुन्हा भूकंपाचे हादरे (३ जानेवारी) बुधवारी दुपारी १.४७ च्या सुमारास जाणवले. ३.४ रिश्टर एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे हे धक्के फारसे तीव्र नसले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. नवीन वर्ष सुरू होताच पुन्हा भूकंपांचे हादरे सुरू झाले असून नागरिकांमध्ये पुन्हा चिंतेचे वातावरण पसरले आहे.