Lokmat Agro >हवामान > विदर्भात झाडांवर लाखोंच्या संख्येत कीटक, हवामान बदलाचा परिणाम?

विदर्भात झाडांवर लाखोंच्या संख्येत कीटक, हवामान बदलाचा परिणाम?

Millions of stink bug insects on trees in Vidarbha, effect of climate change? | विदर्भात झाडांवर लाखोंच्या संख्येत कीटक, हवामान बदलाचा परिणाम?

विदर्भात झाडांवर लाखोंच्या संख्येत कीटक, हवामान बदलाचा परिणाम?

वर्धा, नागपूर परिसरात काही दिवसांपासून एकाच झाडावर लाखोंच्या संख्येने कीटकपुंज आढळत असल्याने सामान्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.

वर्धा, नागपूर परिसरात काही दिवसांपासून एकाच झाडावर लाखोंच्या संख्येने कीटकपुंज आढळत असल्याने सामान्यांमध्ये काळजीचे वातावरण आहे.

शेअर :

Join us
Join usNext

विदर्भात गेल्या काही दिवसांपासून काही झाडांवर लाखोंच्या संख्येने कीटक दिसून येत आहेत. अगदी लाखोंच्या समूहाने ते झाडाच्या खोडाला चिकटून आहेत. कीटकांच्या जवळ गेल्यावर घाण दुर्गधीही येते व स्पर्श केल्यास हाताला लाल रंग लागतो. मानवासाठी व झाडांसाठी हानीकारक तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

वर्धा जिल्ह्याच्या कारंजा घाडगेजवळील बिहाडीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील वर्गखोलीला लागून असलेल्या टिपरींच्या झाडावर गेल्या अनेक दिवसांपासून ही कीटक मुळापासून ते शेंड्यापर्यंत असंख्य प्रमाणात असल्याची माहिती स्थानिक पर्यावरणप्रेमी प्रवीण कडू यांनी दिली आहे. 

चार-पाच दिवसांपासून कडक ऊन तापायला लागल्यानंतर ही कीटक झाडाच्या फांद्यांवरून वर्गामध्ये शिरत आहेत. यांना असह्य असा उग्र वास येतो. हातात धरल्यास हात लाल होतो आणि रंग सहजासहजी जात नाही. हा कीटक एका शिक्षकाच्या मानेला चावल्यानंतर दोन दिवसांपासून इंजेक्शन टोचल्यासारख्या वेदना होत असल्याची माहिती त्यांनी दिली. शाळेतील बालकांच्या धोकादायक असल्याने लोकांमध्ये भीती आहे. 

नागपुरातही काही झाडांवर हे कीटक दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, हवामानात बदल झाल्याने हा प्रकार घडतोय.

क्लोरोपायरीफास फवारल्यास मरतात

बाजारात क्लोरोपायरीफासाची पावडर किंवा द्रावण या कीटकांवर फवारल्यास त्यांचा नायनाट होत असल्याचे डॉ. दवणे यांनी स्पष्ट केले. २० मिली. द्रव १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास स्टिंग बग नाहीसे होतात. मात्र, फवारणी करताना डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. कीटक चावल्याने वेदना अधिक होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

हा 'स्टिंक बग', धोकादायक नाही 
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवणे यांनी तो स्टिंक बग' असल्याचे स्पष्ट केले. हे कीटक त्यांच्या ओटीपोटातील ग्रंथीमधून स्कंक, सिलेंन्ट्रो आणि अमोनियाचे मिश्रण असलेला तीव्र गंध सोडतात. हा कीटक चावल्याने हलक्या वेदना होतात. एखाद्या झाडाजवळ थंडावा असेल व झाडाचा गंध त्यांना आवडला तर ते मोठ्या संख्येने जमा होतात. मात्र, हा कीटक मानवासाठी किवा झाडांसाठीही हानीकारक किंवा धोकादायक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Millions of stink bug insects on trees in Vidarbha, effect of climate change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.