Lokmat Agro >हवामान > Monsoon 2024 : बुधवारी राज्यात 'या' ठिकाणी झालेला मॉन्सूनच्या इतिहासातील सप्टेंबरचा विक्रमी पाऊस

Monsoon 2024 : बुधवारी राज्यात 'या' ठिकाणी झालेला मॉन्सूनच्या इतिहासातील सप्टेंबरचा विक्रमी पाऊस

Monsoon 2024 : Record rainfall for September in the history of Monsoon at this place in the state on Wednesday | Monsoon 2024 : बुधवारी राज्यात 'या' ठिकाणी झालेला मॉन्सूनच्या इतिहासातील सप्टेंबरचा विक्रमी पाऊस

Monsoon 2024 : बुधवारी राज्यात 'या' ठिकाणी झालेला मॉन्सूनच्या इतिहासातील सप्टेंबरचा विक्रमी पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मॉन्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षानंतरचा विक्रमही मोडित काढला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मॉन्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षानंतरचा विक्रमही मोडित काढला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे असलेल्या नोंदीनुसार पुण्यात बुधवारी दिवसभरात झालेला १३३ मिलिमीटर पाऊस हा मॉन्सूनच्या हंगामातील १८९६ नंतरचा आजवरचा तिसरा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तसेच या पावसाने सप्टेंबर महिन्यातील ८६ वर्षानंतरचा विक्रमही मोडित काढला आहे. या मुसळधार पावसामुळे चांगलीच दैना उडाली होती.

काय घडले?

केवळ दोन तासांत १२४ 'मिमी'ची नोंद. हवामान विभागाने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत नोंदविलेल्या आकडेवारीनुसार शिवाजीनगर येथे केवळ दोन तासांत तब्बल १२४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. तर चिंचवड येथे १२७ मिलिमीटर, वडगावशेरीत ७१ तर कोरेगाव पार्कमध्ये ६३ मिलिमीटर पाऊस पडला.

रेड अलर्ट प्रत्यक्षात उतरला

भारतीय हवामानशास्त्र विभागाने बुधवारी पुण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला होता. मात्र, दुपारनंतर ढगांची स्थिती पाहता यात बदल करून रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि हा रेड अलर्ट प्रत्यक्षातही उतरला. शहरात दुपारपासूनच काळ्याकुट्ट ढगांची गर्दी झाली होती. सुमारे साडेतीनच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याची तीव्रता वाढत गेल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचून अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले होते.

ढगफुटीसदृश्य पाऊस

हवामान विभागाच्या गृहितकानुसार एका तासात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास ढगफुटी झाली असे समजले जाते. मात्र, शहरात बुधवारी झालेला हा पाऊस सुमारे दोन तासांमध्ये झाल्याने ही ढगफुटी नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजेपर्यंत शिवाजीनगर येथे एकूण पाऊस १३१ मिलिमीटर झाला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांमध्ये शिवाजीनगर येथे तब्बल १३३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

आजवरचा तिसरा विक्रमी

• भारतीय हवामानशास्त्र विभागाकडे उपलब्ध असलेल्या १८९६ पासूनच्या आकडेवारीनुसार बुधवारी झालेला हा पाऊस पुण्यातील आजवरचा सर्वाधिक तिसरा विक्रमी पाऊस ठरला आहे. यापूर्वी ५ ऑक्टोबर २०१० मध्ये तब्बल १८१.१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती त्यानंतरचा दुसरा सर्वाधिक पाऊस १७ ऑगस्ट १९८७ रोजी १४१.७ मिलिमीटर इतका पडला होता.

• त्यानंतर बुधवारी झालेला पाऊस १३३ मिलिमीटर इतका नोंदविण्यात आला आहे. या पावसामुळे शिवाजीनगर, पेठांचा भाग तसेच शहराच्या पूर्वेकडील भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

आमच्या जोडण्यासाठी 'येथे' क्लिक करा 

Web Title: Monsoon 2024 : Record rainfall for September in the history of Monsoon at this place in the state on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.