राज्यात नैऋत्य मोसमी वारे (Southwest Monsoon) बहुतांश ठिकाणी सक्रीय झाले असून आज दक्षिण महाराष्ट्राकडून पूर्व विदर्भाच्या दिशेने मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाने(IMD) वर्तवली आहे. आज २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसचा यलो अलर्ट ( Maharashtra yellow Alert today) देण्यात आला असून इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज पावसाची जोरदार हजेरी लागणार असून मराठवाडा, विदर्भातही वादळी वाऱ्याच्या पावसचाी शक्यता आहे. पुढील ३ ते ४ दिवस विदर्भात मुसळधार पाऊस राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले असून मराठवाड्यातही २ ते ३ दिवस पावसचा अलर्ट देण्यात आले आहेत.
आज काेणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार?
मध्य महाराष्ट्र- अहमदनगद, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, साेलापूर
मराठवाडा- छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर,धाराशिव
विदर्भ- अकोला,अमरावती,भंडारा,बुलढाणा,चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ