Join us

राज्यात पावसाची रिपरिप वाढणार, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2023 12:00 PM

मुंबईसह विदर्भ ,मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी पाऊस झाला असून, रविवारीही मान्सून विदर्भ , मराठवाड्यात सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाने ...

मुंबईसह विदर्भ,मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी पाऊस झाला असून, रविवारीही मान्सून विदर्भ, मराठवाड्यात सक्रिय राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रविवारीही विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला असून कोकणातही पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, २० ऑगस्टला मध्य प्रदेश आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारत आणि गुजरातमध्येही पावसाची शक्यता आहे. २१ ऑगस्टपासून पूर्व आणि उत्तर पूर्व भारतात मान्सूनचा जोर वाढेल. 

कुठे दिलासा, कुठे प्रतीक्षा

  • नागपूर : शनिवारी सायंकाळी दीड तास जोरदार पाऊस. २४ तासांत २९.६ मिमी नोंद.
  • गडचिरोली धानोरा येथे सर्वाधिक ९०.८ मिमी पाऊस झाला.
  • गोंदिया : सलग तिसऱ्या दिवशी संततधार, नद्या-नाल्यांमध्ये पाणीच पाणी. वर्तविली आहे. 
  • भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूरमध्येही पाऊस झाला.
  • अकोला : पश्चिम विदर्भात वाशिम वगळता इतर जिल्ह्यांत चांगल्या पावसाची नोंद
  • नांदेड : २४ तासात सहा मंडळांमध्ये अतिवृष्टी, लातुरात हुलकावणी.

वृद्ध गेला नाल्यात वाहून

चुरडी (ता. तिरोडा, जि. गोंदिया) येथील शालीकराम प्रजापती (८०) हे गावातील नाल्यात निर्माल्य टाकण्यासाठी गेले असता, शनिवारी दुपारी पुरात वाहून गेले.

नाशकात हजेरी

नाशिक शहर आणि परिसरात शनिवारी (दि. १९) रात्री पावसाने सुमारे अर्धा तास हजेरी लावली.' त्यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने जिल्हावासियांचे डोळे आकाशाकडे लागले होते.

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजमहाराष्ट्रपाऊसमराठवाडाविदर्भहवामानमोसमी पाऊस