प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 1 ऑगस्ट रोजी नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हयात तर दिनांक 02 ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, लातूर, जालना जिल्हयात तर दिनांक 03 ऑगस्ट रोजी औरंगाबाद, जालना, परभणी जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
दिनांक 02 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 ते 03 ऑगस्ट दरम्यान बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक 04 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी तर 05 ऑगस्ट रोजी तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 04 ते 10 ऑगस्ट दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. दिनांक 06 ते 12 ऑगस्ट 2023 दरम्यान कमाल तापमान, किमान तापमान सरासरीएवढे व पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे तर जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढलेले आहे.
दिनांक 02 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पाऊस झाल्यास पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा, असा सल्ला कृषी तज्ञांनी दिला आहे.