Join us

मान्सून आला.. मान्सून आला.. नक्की मान्सून म्हणजे आहे तरी काय? कसा पडतो पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 9:18 AM

Monsoon Rain मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का, असे अनेकदा सामान्य नागरिक प्रश्न विचारत असतात. त्यावर खुळे यांनी सांगितले की, मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस झालाच पाहिजे, असे नाही.

आपल्याकडे वर्षातील ४ महिने बाष्पयुक्त वारे नैऋत्यकडून ईशान्यकडे वाहतात. या नैऋत्यकडून येणाऱ्या मौसमी वाऱ्यांना मान्सून म्हटले जाते. आता या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल किंवा दमदारपणा असेल तरच पाऊस होतो, अन्यथा होत नाही.

त्यामुळे मान्सून आला तरी अनेकदा पाऊस होत नाही, तिथे चक्क ऊन पडते. बाष्पयुक्त ऊर्जा नसेल तर पाऊस होत नाही, अशी माहिती निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का, असे अनेकदा सामान्य नागरिक प्रश्न विचारत असतात. त्यावर खुळे यांनी सांगितले की, मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस झालाच पाहिजे, असे नाही.

पण, मान्सून पोहोचला म्हणजे मान्सूनच्या मूळ उगमापासून विषुववृत्तावर (दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील पेरू कोलंबिया, इक्वेडोर देशापासून) समुद्रावरून अंदाजे एकोणवीस (१९,०००) हजार किलोमीटर अंतर कापून वारे वाहत येतात.

ते वारे तुमच्या गावापर्यंत बाष्प घेऊन येणाऱ्या वाऱ्यांचा प्रचंड प्रवाह वातावरणीय प्रणालीद्वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे विषुववृत्तीय समांतर वाहत असतो. त्या वाऱ्यांचा रस्ता मोकळा झाला, असेच समजावे. म्हणून तर आपल्याकडे ४ महिने बाष्पयुक्त वारे नैऋत्यकडून ईशान्यकडे वाहतात.

आता या बाष्पयुक्त वाऱ्यात पावसासाठी जबरदस्त ऊर्जा, ताकद असेल किंवा दमदारपणा असेल तरच पाऊस होतो, अन्यथा नाही. अर्थात ही बाष्प-ऊर्जा पावसाळी हंगामात कमी होते किंवा भरली जाते. ऊर्जा कमी झाली तर फक्त मान्सूनी बाष्पयुक्त वारेच ही ऊर्जा पुन्हा भरू शकतात.

यंदा मान्सून आला तरी पाऊस नाही, अशी परिस्थिती आली तर काळजी करू नका. कारण यंदा 'ला निना' आहे, त्यामुळे बाष्प-ऊर्जास्रोताची उपलब्धता भरपूर असेल. त्यामुळे मान्सून प्रवाहादरम्यान ऊर्जा कमी झाली, तर निसर्ग आपोआप भरण्याची व्यवस्था करतो. - माणिकराव खुळे, सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ, पुणे

अधिक वाचा: Cloud Burst Rainfall ढगफुटी होते म्हणजे नक्की काय होते?

टॅग्स :मोसमी पाऊसहवामानमोसमी पावसाचा अंदाजपाऊसचक्रीवादळ