Lokmat Agro >हवामान > Monsoon News: मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? केरळहून आता नैऋत्य मोसमी पावसाची ईशान्येकडे झेप

Monsoon News: मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? केरळहून आता नैऋत्य मोसमी पावसाची ईशान्येकडे झेप

Monsoon News: How far has the monsoon progressed? Southwest Monsoon rains from Kerala now move towards northeast | Monsoon News: मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? केरळहून आता नैऋत्य मोसमी पावसाची ईशान्येकडे झेप

Monsoon News: मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? केरळहून आता नैऋत्य मोसमी पावसाची ईशान्येकडे झेप

महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येणार? हवामान विभाग काय म्हणतंय?

महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येणार? हवामान विभाग काय म्हणतंय?

शेअर :

Join us
Join usNext

देशात प्रचंड उष्णतेने आणि उकाड्याने जीव कासावीस होत असताना मान्सूनच्या वाटेकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून ईशान्येकडील राज्यांच्या दिशेने मान्सूनची प्रगती सुरु आहे. आता पाऊस नागालँड मणीपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश त्रिपूरा,आसाम आणि मेघालयाच्या बहुतांश भागात दाखल होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा दोन दिवस आधीच आला. ५ जूनपर्यंत मान्सून इशान्येकडील राज्यांमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले. ईशान्येकडील राज्यात ६ दिवस आधी पोहोचणार आहे.

१० जूनपासून राज्यात मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता मान्सून लक्षद्वीपसह अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे.

 वातावरणात सातत्याने बदल होत असून मान्सून (Monsoon 2024) देखील काही दिवसात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आता सोमवार दि. ३ जून पासून आठवडाभर म्हणजे शुक्रवार १० जूनपर्यंत महाराष्ट्रातील (Maharashtra Monsoon Update) सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर,, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली या ९ जिल्ह्यात फक्त पूर्व मोसमी गडगडाटी वळीव पावसाची (rain) शक्यता जेष्ठ निवृत्त  तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. 

 

Web Title: Monsoon News: How far has the monsoon progressed? Southwest Monsoon rains from Kerala now move towards northeast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.