Join us

Monsoon News: मान्सूनची प्रगती कुठपर्यंत? केरळहून आता नैऋत्य मोसमी पावसाची ईशान्येकडे झेप

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 01, 2024 12:36 PM

महाराष्ट्रात मान्सून कधीपर्यंत येणार? हवामान विभाग काय म्हणतंय?

देशात प्रचंड उष्णतेने आणि उकाड्याने जीव कासावीस होत असताना मान्सूनच्या वाटेकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत. नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून इशान्येकडील राज्यांच्या दिशेने मान्सूनची प्रगती सुरु आहे. आता पाऊस नागालँड मणीपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश त्रिपूरा,आसाम आणि मेघालयाच्या बहुतांश भागात दाखल होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

साधारणपणे १ जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा मान्सून यंदा दोन दिवस आधीच आला. ५ जूनपर्यंत मान्सून इशान्येकडील राज्यांमध्ये दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने वर्तवले. इशान्येकडील राज्यात ६ दिवस आधी पोहोचणार आहे.

१० जूनपासून राज्यात मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आता मान्सून लक्षद्वीपसह अरबी समुद्रात पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे.

 

टॅग्स :मोसमी पावसाचा अंदाजमोसमी पाऊसहवामानकेरळ