Lokmat Agro >हवामान > Monsoon Update मान्सूनची वाटचाल वेगाने, लवकरच महाराष्ट्रातही दाखल

Monsoon Update मान्सूनची वाटचाल वेगाने, लवकरच महाराष्ट्रातही दाखल

Monsoon Update; Monsoon is moving fast, soon it will enter Maharashtra too | Monsoon Update मान्सूनची वाटचाल वेगाने, लवकरच महाराष्ट्रातही दाखल

Monsoon Update मान्सूनची वाटचाल वेगाने, लवकरच महाराष्ट्रातही दाखल

शेतकरी व नागरिकांसाठी आनंदवार्ता असून, ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात, तो Monsoon in Maharashtra मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी (दि. ३०) अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला.

शेतकरी व नागरिकांसाठी आनंदवार्ता असून, ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात, तो Monsoon in Maharashtra मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी (दि. ३०) अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : शेतकरी व नागरिकांसाठी आनंदवार्ता असून, ज्याची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात, तो मान्सून अखेर केरळ व ईशान्य भारतात गुरुवारी (दि. ३०) अंदाजानुसार एक दिवस आधीच दाखल झाला. त्याची वाटचाल वेगाने होत असून, लवकरच महाराष्ट्रातही दाखल होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

गेल्या वर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळाचे सावट आहे. म्हणून पावसाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे. काही दिवसांपासून देशात तापमानाचा पारा चांगलाच कडाडला आहे.

विदर्भ, मराठवाड्यात उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यातच पुढील आठवड्यात मान्सून राज्यात दाखल होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

यंदा धो-धो बरसणार!
दरवर्षी मान्सून केरळमध्ये १ जून रोजी दाखल होतो. यंदा मात्र दोन दिवस आधीच दाखल झाला आहे. यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे १९ मे रोजी दाखल झाला. त्यानंतर मान्सूनची वाटचाल चांगली राहिली आहे. यंदा देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.

आतापर्यंत कधी आला मान्सून?
वर्ष - दाखल - अंदाज

२०१९ - ८ जून - ६ जून
२०२० - १ जून - ५ जून
२०२१ - ३ जून - ३१ मे
२०२२ - २९ मे - २७ मे
२०२३ - ८ जून - ४ जून
२०२४ - ३० मे - ३१ मे

अधिक वाचा: Rabies पिसाळलेला कुत्रा जनावरांना चावला तर काय होऊ शकते?

Web Title: Monsoon Update; Monsoon is moving fast, soon it will enter Maharashtra too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.