Join us

Mula Dam : मुळा धरण भरले.. ११ दरवाज्यातून जायकवाडीकडे चार हजार क्युसेकने पाणी झेपावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:45 AM

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजाने थैमान घातले आहे. त्यामुळे धरणाकडे कोतूळ येथून ६२५, तर मधील पट्टयांमधून अडीच हजारांच्या आसपास पाण्याची आवक होत आहे.

राहुरी: मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर वरुणराजाने थैमान घातले आहे. त्यामुळे धरणाकडे कोतूळ येथून ६२५, तर मधील पट्टयांमधून अडीच हजारांच्या आसपास पाण्याची आवक होत आहे.

धरणाच्या ११ मोऱ्याद्वारे जायकवाडीकडे चार हजार क्युसेकने पाणी झेपावले आहे. मुळा धरणाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखा अभियंता राजेंद्र पारखे, सहायक सलीम शेख व कर्मचारी धरणाच्या पाणीसाठ्यावर लक्ष ठेवून आहेत.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २६ हजार (१०० टक्के) दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. यंदाच्या वर्षी मुळा धरणात २९ हजार ९८६ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले.

डावा कालवा बंद आहे, तर उजवा कालवा ६०० क्यसेकने सुरू आहे. वांबोरी चारी १३४.७६ दशलक्ष घनफूट पाणी वापरात आले आहे.

टॅग्स :धरणपाणीपाऊसजायकवाडी धरणमुळा मुठा