वातावरणासंदर्भातील बुधवार दि.२० डिसेंबर २०२३ ची नोंद
पहाटेचे किमान तापमान -१ - मुंबईसह कोकणातील ७ व सांगली कोल्हापूर व दक्षिण सातारा अशा १० जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १६ डिग्रीच्या आसपास म्हणजे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधिकच जाणवत आहे. उर्वरित महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यात मात्र हे पहाटेचे किमान तापमान ११ डिग्रीच्या आसपास म्हणजे सरासरीपेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिकच जाणवत आहे. त्यातही विशेषतः विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अश्या ६ जिल्ह्यात पहाटेचे हे किमान तापमान तर एकांकी म्हणजे ९ डिग्रीच्या आसपासही जाऊ शकते.
विदर्भ व उर्वरित महाराष्ट्रातील थंडी देणाऱ्या ह्या पहाटेच्या तापमानातील फरक हा सध्याच्या कालावधीत असलेल्या असमान हवेच्या दाबातील फरक ह्यामुळे थंडीचे हे सातत्य टिकून आहे. सध्या महाराष्ट्रावर वारा शांत नाही. उत्तरेकडून महाराष्ट्रावर येणाऱ्या वाऱ्याचा वेग ताशी १० ते १२ किमी. इतका आहेच. त्यामुळे थंडी जाणवत आहे.
शुक्रवार दि. २२ डिसेंबर पासून अजुन एक नवीन पश्चिमी झंजावात उत्तर भारतात पश्चिमी हिमालयीन क्षेत्रात आदळण्याच्या शक्यतेमुळे डिसेंबरअखेर पर्यन्त महाराष्ट्रात अशा थंडीची अपेक्षा करूया.
दुपारचे कमाल तापमान मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान ३१ ते ३२ डिग्री तर उर्वरित उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात मात्र हे दुपारचे कमाल तापमान २९ डिग्रीच्या आसपास जाणवत आहे. मुंबईसह कोकण व विदर्भातील १८ जिल्ह्यांत हे तापमान सरासरी पेक्षा दिड डिग्रीच्या आसपास तर उर्वरित १८ जिल्ह्यात हे दुपारचे कमाल तापमान सरासरी पेक्षा चार डिग्रीच्या आसपास कमी आहे. म्हणून तर दिवसाही चांगलीच थंडी वाजत आहे.
- माणिकराव खुळे (Meteorologist Retd. IMD Pune.)