NABARD : 'नाबार्ड'ने (NABARD) प्रसिद्ध केलेल्या 'संभाव्य संलग्न पत योजना' ('Potential Affiliated Credit Scheme' ) (पीएलपी) २०२५-२६' अहवालात बुलढाणा जिल्हा हवामान बदलाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील जिल्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेषतः दुष्काळ, असमान पर्जन्यमान आणि तापमानवाढ यामुळे कृषी उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचे अधोरेखित केले आहे. अहवालानुसार, खामगाव तालुक्यात गेल्या काही वर्षामध्ये तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढले आहे.
जिल्ह्यात पावसाचे वितरण अत्यंत असमतोल असून, कधी अतिवृष्टी, तर कधी अल्प पर्जन्य अशी स्थिती निर्माण होते. यामुळे शेती उत्पादन घटते व शेतकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
हवामानदृष्ट्या संवेदनशील बनलेल्या बुलढाणा व नंदुरबार जिल्ह्यातील एकत्रित एकूण ५१ गावांमध्ये 'नाबार्ड'च्या (NABARD) माध्यमातून 'पाणी व्यवस्थापन व हवामान सुसंग कृषी तंत्रज्ञान स्वीकार कार्यक्रम' राबवण्यात येत आहे.
या प्रकल्पामुळे दहा ते बारा हजार कुटुंबांना हवामान सुसंग शेती पद्धतींचा लाभ मिळत आहे. त्याअनुषंगाने अभ्यास, प्रयोगशील उपाय आणि धोरणात्मक पावले उचलण्यास प्रारंभ करण्यात आल असून, त्यात मृदा आरोग्य व्यवस्थापन, सेंद्रिय व नैसर्गिक खते यांचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमही राबविण्यात येत आहे.
'नाबार्ड'चे हवामान धोरण आणि निधी आराखडा
* 'नाबार्ड'ने 'हवामान धोरण २०३०' अंतर्गत पर्यावरणस्नेही कर्जवाटप, बाजारसृजन आणि निधी संकलन या तीन क्षेत्रांवर भर दिला आहे.
* भारतात २०३० पर्यंत हवामान अनुकूलतेसाठी सुमारे २.५ अब्जा डॉलर (अंदाजे २० लाख कोटी रुपये) एवढ्या निधीची गरज भासणार आहे. यासाठी नाबार्ड विविध राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय निधी स्रोतांशी समन्वय साधत आहे. यात प्रामुख्याने अनुकूलन निधी, हरित हवामान निधीचा प्रामुख्याने समावेश आहे.
* हवामान बदल ही आता संभाव्य धोक्याची बाब असली तरी हे वास्तव स्वीकारून नाबार्डच्या (NABARD) मार्गदर्शनानुसार योग्य निधी नियोजन आणि धोरणात्मक कृतीद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील शेती व ग्रामीण जीवनशैली हवामान सुसंग आणि टिकाऊ बनवण्याची यानिमित्ताने संधी निर्माण झाली आहे.
हे ही वाचा सविस्तर : Zero Tillage Technology: शुन्य मशागत 'तंत्र'च का? जाणून घ्या सविस्तर