NABARD: हवामान बदलामुळे शेतीवरील धोका वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर 'नाबार्ड'मार्फत (NABARD) बुलढाणा जिल्ह्यात हवामान बदलासाठी राष्ट्रीय अनुकूलन निधी उपक्रमांतर्गत 'हवामान सुसंगत शेती' (climate-resilient agriculture) हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येत आहे.
२०२६ मध्ये या प्रकल्पाची मुदत संपत आहे. प्रायोगिकस्तरावरील प्रकल्पामध्येच चांगले सकारात्मक बदल समोर आले आहे. 'हवामान सुसंग शेती' (climate-resilient agriculture) या संकल्पनेला याअंतर्गत चालना देण्यात येत असून, जलसक्षम शेती व्यवस्थापन आणि हवामान सुसंग तंत्रज्ञान स्वीकारून शाश्वत शेती प्रणालीचा विकास करण्याचा यात उद्देश ठेवण्यात आलेला आहे. (NABARD)
या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पाण्याचा कार्यक्षम वापर, हवामान बदलास अनुरूप पीक पद्धतींचा अवलंब, आणि शाश्वत उत्पादन शक्ती टिकवून ठेवणे असा आहे. (NABARD)
हा प्रकल्प बुलढाणा आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांतील एकूण ५१ गावांमध्ये राबविण्यात येत आहे. यामध्ये बुलढाण्यातील १४ गावे सहभागी असून, १० हजार ते १२ हजार शेतकरी कुटुंबांना थेट फायदा होणारा हा प्रकल्प आहे. (NABARD)
बुलढाणा जिल्ह्यात प्रकल्प कधीपासून व कोठे सुरू झाला?
हा प्रकल्प २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून जिल्ह्यात सुरू झाला आहे. यामध्ये खामगाव, चिखली, शेगाव व देऊळगाव राजा तालुक्यातील निवडक गावे सहभागी आहेत. या गावांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
प्रकल्प कशा पद्धतीने राबविला जातो ?
या प्रकल्पाचे नेतृत्व नाबार्ड करीत असून, राज्य कृषी विभाग, कृषी विद्यापीठ अकोला, केव्हीके आणि स्थानिक शेतकरी उत्पादक कंपन्या यांचे सहकार्य घेतले जाते. गावपातळीवर सेंद्रिय शेती, ठिबक व तुषार सिंचन, मृद व्यवस्थापन, पाणी साठवण योजना, हवामान सल्ला सेवा यांची अंमलबजावणी केली जाते.
शेतकऱ्यांना हवामान सुसंग पिक निवड, नैसर्गिक खतांचा वापर आणि उत्पादन खर्च नियंत्रण याचे प्रशिक्षणही दिले गेले आहे. दरम्यान हवामान बदलाच्या परिणामांपासून शेती क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी 'एनएएफसीसी' अंतर्गत राबविला जाणारा हा प्रकल्प बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक उपयुक्त व दिशादर्शक उपक्रम ठरत आहे. (climate-resilient agriculture)
नजीकच्या काळात हे मॉडेल जिल्ह्यातील इतर गावांतही विस्तारले जाण्याची शक्यता आहे. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. (climate-resilient agriculture)
हे ही वाचा सविस्तर : NABARD: 'नाबार्ड'चे हवामान धोरण जाणून घ्या सविस्तर