Lokmat Agro >हवामान > Nagpur Earthquake : नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के वाचा सविस्तर 

Nagpur Earthquake : नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के वाचा सविस्तर 

Nagpur Earthquake : earthquake hits nagpur and telangana border | Nagpur Earthquake : नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के वाचा सविस्तर 

Nagpur Earthquake : नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के वाचा सविस्तर 

नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nagpur Earthquake)

नागपूरसह तेलंगाणा सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले. परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nagpur Earthquake)

शेअर :

Join us
Join usNext

Nagpur Earthquake :  नागपुरात हनुमाननगर, पायोनिअर कॉलनी येथे भूकंपाचे धक्क जाणवले आहेत. तेलंगणा येथील मुलुगू या जिल्ह्यात ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्रबिंदू मुलुगू जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर होता. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे ४२५ किलोमीटर अंतरावर आहे.

तेलंगण येथील मुलुगू या जिल्ह्यात ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्र बिंदू मुलुगू जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर होता. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे ४२५ किलोमीटर अंतरावर आहे. नागपूरसह विदर्भाला भूकंपाचे धक्के, ५.३ रिश्टर स्केलची नोंद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेजवळ आज (४ डिसेंबर ) रोजी सकाळी भूकंपाचा जोरदार झटका जाणवला. भूकंपाचे धक्के चंद्रपूरपर्यंत जाणवले आहेत. 
तेलंगाणा जवळ ५.० तीव्रतेचा झटका जाणवला, असल्याची माहिती मिळाली आहे. 

चंद्रपूर शहरात सकाळी साडेसातच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांना हे धक्के जाणवले. भूकंपामुळे घरांच्या खिडक्यांचा आवाज येत होता. चंद्रपूर नजीकच्या तेलंगणा राज्यातील मुलुंगमध्ये मोठा भूकंप झाल्याचे समजते आहे.

नागरपूरमध्ये काय परिस्थिती 

नागपूरसह पूर्व विदर्भातील काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आज () सकाळी ७.३० ते ७.३५ या दरम्यान हे धक्क जाणवल्याचे समजते. 
नागपुरातील हनुमाननगर, पायोनिअर कॉलनी येथे भूकंपाचे धक्क जाणवले आहेत.

तेलंगणा सीमेवर धक्का

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. खाणीत कोळसा काढण्यासाठी सुरुंग स्पोट केला असावा असा अनेकांचा समज झाला होता. मात्र आता हे भूकंपाचे धक्के होते, असे सांगण्यात येत आहे.  गडचिरोली, चंद्रपुर आणि यवतमाळ जिल्ह्यात धक्के जाणवले.

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे. हा भाग गोदावरी फॉल्ट भूकंप क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे जेव्हा जेव्हा भूकंप होतात तेव्हा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सीमा भागात याची मोठी झळ बसते. साधारण: १० वर्षांपूर्वी असेच धक्के गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन परिसरात बसले होते. 

अनेकांनी घर दार सोडून मोकळ्या जागेत आपले गेले होते. येथील गावकऱ्यांच्या मनात असलेली भीती काढण्यात प्रशासनाला यश आले होते. परंतू आज पुन्हा झालेल्या भूकंपाने १० वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची नागरिकांना आठवण झाली.
 

Web Title: Nagpur Earthquake : earthquake hits nagpur and telangana border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.