Join us

Nashik Dam Updates : नाशिक जिल्ह्यातील धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढला! 'भंडारदरा'ही शंभरीकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 10:34 PM

Nashik Dam Updates : सर्वच धरणातील विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भंडारदरा धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले आहे. 

Nashik Dam Updates : नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली असून येथील नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. तर सर्वच धरणातील विसर्गामध्ये वाढ करण्यात आली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर भंडारदरा धरणातूनही मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले आहे. 

भंडारदरा धरणातून निळवंडे धरणात पाणी येते आणि त्यानंतर पुढे सोडले जाते. सध्या भंडारदरा धरण ९६ टक्के भरले असून निळवंडे धरण ६८ टक्के भरले आहे. तर अढाळा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग करण्यात आल्यामुळे गोदापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी पूर्वेकडे वाहू लागले आहे. जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढताना दिसत आहे. 

दरम्यान, भंडारदरा धरणातून आज (३ ऑगस्ट) सायंकाळी ७ वाजता धरणातून ९ हजार ५८२ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तर निळवंडे धरणातून ८०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर असलेल्या अढाळा धरणातून २७७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

धरणे आणि धरणातील विसर्ग (३ ऑगस्ट रात्री ९ वाजताची आकडेवारी)

  • दारणा - १९ हजार ९७२ क्युसेक
  • भावली - १ हजार २१ क्युसेक
  • कडवा - ८ हजार २९८ क्युसेक
  • नांदूर मध्य. - ३३ हजार ५७६ क्युसेक
  • भाम - ५ हजार ९२० क्युसेक
  • पालखेड - २ हजार १३१ क्युसेक
टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसशेतकरी