Join us

Nira Canal नीरा उजव्या कालव्याद्वारे वीर धरणातून आवर्तन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2024 11:25 AM

माळशिरस तालुक्यात गेल्या महिनाभरापासून निरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. आता निरा उजवा कालव्यात वीर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

माळशिरस तालुक्यात गेल्या महिनाभरापासून निरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती. आता निरा उजवा कालव्यात वीर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नीरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले होते. पाणीटंचाईमुळेशेतकरी व ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी वीर धरणातून निरा उजवा कालव्यामध्ये पाण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने वीर धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुरू केल्याने यांचा पाणीटंचाईग्रस्त गावांना मोठा दिलासा मिळाला आहे.

१८ हून अधिक टँकरने पाणीपुरवठामाळशिरस तालुक्यातील १६ ते १७ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहेत. सध्या माळशिरस येथे १८ हून अधिक टँकरने नागरिक व जनावरांना पिण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे निरा उजवा कालव्याचे पिण्याचे आवर्तन सुटल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

माळशिरस तालुक्यातील सध्याची स्थिती१८ गाव व १८५ वाड्यावस्तींवर ३६,२५१ लोकांसाठी भांब, पिंपरी, गारवाड, मगरवाडी, फडतरी, कोथळे, फडतरी (निटवेवाडी), फडतरी (शिवार वस्ती), माणकी, बचेरी, लोणंद, लोंढे, मोहितेवाडी, सुळेवाडी, जळभावी, उंबरे दहिगाव, शिगोर्णी, रेडे, गिरवी आदी गावात टँकर चालू आहेत.

नीरा उजवा कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुटले आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून पाणी काटकसरीने वापरावे. निरा उजव्या कालव्यातून हे आवर्तन तीन ते चार दिवस सुरू राहणार आहे. - किरण मोरे, सहायक गटविकास अधिकारी, माळशिरस

अधिक वाचा: Dam Water Storage पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांचा पाणीसाठा खालावला

टॅग्स :धरणपाणीशेतकरीशेतीपाणी टंचाईपाणीकपात