नीरा: परतीच्या पावसाने आठवडाभर दमदार हजेरी लावल्यानंतर २०२३ चा पावसाळी हंगाम संपला आहे. नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील चार ही धरणे शंभर टक्के भरून दोन महिने वाहील.
४८ टीएमसी क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चार धरणातून ६० टीएमसी पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. हे पाणी थेट कर्नाटकात गेल्याने नीरा खोऱ्यातील पाणी पुरंदर, बारामती व इंदापूरच्या दुष्काळी भागात का वळवले जात नाही? असा प्रश्न अवर्षणप्रवण भागातील शेतकरी विचारत आहेत.
भोर, वेल्हा तालुक्यातील डोंगराळ भागानंतर नीरा नदीच्या काठावरील भागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणांचे पाणी कालव्याद्वारे फिरवले. नदीकाठापासून फक्त दोन ते तीन किलोमीटरवरून हा कालवा जातो. कालव्याच्या व नदीपात्रांचा मंदिर भाग हा बागायती भाग म्हणून ओळखला जातो.
उसासह बारमाही पिके येथील शेतकरी घेतात; पण कालव्याच्या उत्तरेकडील शेतकरी उन्हाळ्यात पाणी समस्येला तोंड देता देता नाकीनऊ येते. नीरा देवघर, भाटघर, गुंजवणी व veer dam वीर ही चार धरणे नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात येतात.
वीर धरणानंतर कर्नाटकापर्यंत आधी नीरा, चंद्रभागा व कृष्णा नदीवर एकही धरण नाही. त्यामुळे वीर धरणातून विसर्ग झाल्यानंतर ते पाणी थेट अलमट्टी धरणात जाते. पुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यातून या नदीचा प्रवास आहे.
नदीकाठापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर कायम पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. हा भाग कायम अवर्षणग्रस्त भाग म्हणून नोंद आहे. दर दोन वर्षांनी या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते. परिणामी, जानेवारी महिन्यातच टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो.
सन २०२२ सालच्या पावसाळी हंगामात वीर धरणातून एक थेंबही पाण्याचा विसर्ग झाला नव्हता. परिणामी, नदीपात्र वर्ष वाहिले नाही. कालवा समितीचे योग्य नियोजन व पाटबंधारे विभागाने तारेवरील कसरत करत कालव्याचे पाणी वेळोवेळी बंद-चालू करत जून २०२४ पर्यंत पुरवले.
कालव्याला नियमित पाणी सोडल्याने शेतीसाठी व पिण्याच्या पाणीपुरवठा योजना सुरळीत चालल्या. मागील वर्षी आजच्या दिवशी चारही धरणांत एकूण ९२.२१ टक्के पाणीसाठा होता, तर आज रोजी १०० टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे कालव्यालगतचे व नदीकाठावरील शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांचे नियोजन केले आहे.
अवर्षणग्रस्त भागभोर, वेल्हा, पुरंदर, बारामती, इंदापूर या तालुक्यातून या नदीचा प्रवास आहे. नदीकाठापासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटरवर कायम पावसाचे प्रमाण अत्यल्प असते, हा भाग कायम अवर्षणग्रस्त भाग म्हणून नोंद आहे. दर दोन वर्षांनी या भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असते.
सोलापूर जिल्ह्यातील नीरा नदीवरील बंधारे तुडुंब भरले• पुरंदर, बारामती, इंदापूर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्यातील व पुढे सोलापूर जिल्ह्यातील नीरा नदी त्याववरील बंधारे तुडुंब भरले आहेत.• धरणातून विसर्ग झालेले ६० टीएमसी पाणी जर दुष्काळी भागात फिरवले गेले तर हजारो एकर शेती ओलिताखाली येऊन शेतकरी सधन होऊ शकतो.• नीरा खोऱ्यातील पाणी पुरंदर, बारामती व इंदापूरच्या दुष्काळी भागात का वळवले जात नाही? असा प्रश्न अवर्षणप्रवण भागातील शेतकरी विचारत आहेत.