Join us

उद्यापासून गारपीटीची शक्यता नाही, कसा असेल पावसाचा अंदाज?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 5:29 PM

थंडीला या तारखेपासून होणार सुरुवात, हवामान तज्ञांचा अंदाज काय?

राज्यात नाशिक, नगरसह बहूतांश भागात अवकाळी पाऊस झाला. गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता असून उद्यापासून गारपीटीची शक्यता राहणार नाही.  बुधवार दि.२९ नोव्हेंबरपासून हळूहळू थंडीच्या सुरवातीची शक्यताही जाणवत असल्याचा  अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिला आहे. 

कसा आहे अंदाज?

मराठवाड्यातील सर्व ८ व विदर्भातील सर्व ११ आणि मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक अश्या २३ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता जाणवते. उर्वरित महाराष्ट्रातील मुंबईसह कोकणातील सर्व ७ व मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर अशा १३ जिल्ह्यात केवळ विखुरलेल्या स्वरूपात केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते. वरील  सर्व २३ जिल्ह्यात आज गारपीट होण्याची शक्यता जाणवत असल्याचे हवामान तज्ञांनी सांगितले. हवामान विभागाने मुंबईसह कोकण किनारपट्टी, मध्य व दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्याचा काही भागात यलो अलर्ट आहे. तर विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

कुठे होणार गारपीट आणि वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज

मंगळवार दि.२८ नोव्हेंबर राजी संपूर्ण महाराष्ट्रात केवळ विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची शक्यता जाणवते.  महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता नाही. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर पर्यंत  संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता असून गारपीटीची शक्यता नाही.  

माणिकराव खुळे, हवामान तज्ञ से.नि, आयएमडी, पुणे

 

टॅग्स :पाऊसगारपीटहवामान