Join us

वीर धरणातून थेंबभरही विसर्ग नाही, बंधारे अजूनही कोरडेच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 3:47 PM

सरासरीच्या कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी एकही थेंब वीर धरणातून विसर्ग झाला नाही. एकदाही नीरा नदीचे पात्रात खळखळून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही काठावरील, तसेच 'वीर'च्या डाव्या उजव्या कालव्यावरील शेतकरी आताच धास्तावले आहेत.

खोऱ्यातील धरण साखळीत समाधानकारक पाऊस न पडल्याने वीर धरण आजही ६५.२५ टक्क्यांवरच रेंगाळले आहे. सरासरीच्या कमी पर्जन्यमान झाल्याने यावर्षी एकही थेंब वीर धरणातून विसर्ग झाला नाही. एकदाही नीरा नदीचे पात्रात खळखळून वाहिले नाही. त्यामुळे नीरा नदीच्या दोन्ही काठावरील, तसेच 'वीर'च्या डाव्या उजव्या कालव्यावरील शेतकरी आताच धास्तावले आहेत.मागील वर्षी मान्सूनपूर्व दमदार हजेरी, मान्सूनमध्ये धुवाधार, तर परतीच्या पावसाने तर हाहाकार माजवला होता. नीरा खोऱ्यातील सर्व धरणे जुलैमध्येच ओव्हरफ्लो झाली होती. त्यामुळे वीर धरणातून महिनाभर नीरा नदीच्या पाणी सोडले जात पात्रात जात होते. तसेच दोन्ही कालवे पूर्ण क्षमतेने सोडले तसेच पावसाचे प्रमाण होते. सरासरीपेक्षा अधिकचे झाल्याने विहिरींची व बोअरवेलची पाणीपातळी वाढलेली त्यामुळे होती. शेतकऱ्यांनी तिन्ही हंगामांत चांगली पिके घेतली.

यावर्षी मात्र गेल्या वर्षीच्या अगदी उलट परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनपूर्व एकही पाऊस झाला नाही. ऐन मान्सूनमध्ये तुरळक सरी कोसळत होत्या, तर परतीचा पाऊस दोन ते तीन दिवसच झाला. त्यामुळे आता दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरंदरच्या दक्षिण पूर्व भागातील एकाही ओढ्या-नाल्यातून पाणी वाहिले नाही. सर्व लहानमोठे बंधारे आजही कोरडेठाक पडले आहेत.

- पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण तालुक्यातील व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतीसाठी वरदान ठरलेली नीरा नदी आणि त्यावरील बंधारे पावसाळा संपला तरी कोरडे पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये चितेचे वातावरण आहे. अशातच सध्या नीरा नदीवर २३ हजार ५०२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता असणारे भाटघर धरण १०० टक्के, ११ हजार ७२९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता असणारे नीरा देवधर १०० टक्के, ३ हजार ६९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता असणाऱ्या गुंजवणी धरणात ३ हजार ६०१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे ९७५७, तर ९ हजार ४०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता असणारे वीर धरणात ६ हजार १६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे ६५.२५ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.नीरा खोऱ्यातील या चारही धरणांमध्ये शनिवारी (दि. १४) दुपारी चार वाजता ४४ हजार ९९८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे ९३.०५ टक्के पाणीसाठा झाला असून, तो मागील वर्षी ४८ हजार ३२९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे १०० टक्के होता.आजच्या तारखेपर्यंत मागील वर्षी तब्बल दोन आठवडे वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात आला होता, सुमारे नऊ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या वीर धरणातून तितक्याच पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मागील वर्षी वौरच्या डाव्या उजव्या कालव्यातून मुबलक पाणी शेतकन्यांनी नियमित देण्यात आले. यावर्षी मात्र आताची धरणाची परिस्थिती पाहता कालव्यांचे पुढील आवर्तने नियमित होतील यात शंका निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

धरणांची स्थिती- नीरा नदीवर २३ हजार ५०२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता असणारे भाटघर धरण १०० टक्के.- ११ हजार ७२९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता असणारे नीरा-देवधर १०० टक्के.- ३ हजार ६९० दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता असणाऱ्या गुंजवणी धरणात ३ हजार ६०९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे १७.५७ टक्के९ हजार ४०८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा साठवण क्षमता असणारे वीर धरणात ६ हजार १६६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा म्हणजे ६५.२५ टक्के.

वीर धरणातून या पावसाळी हंगामात एकदाही पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही. त्यामुळे नीरा नदी आता कोरडीठाक पडल्याचे चित्र आहे. नदीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात पाऊस कमी प्रमाणात झाल्यास मोठ्या दुष्काळाला तोंड द्यावे लागेल. - विजय लकडे, शेतकरी, लकडे वस्ती

टॅग्स :धरणपाणीपाऊसपुणेसोलापूरसातारा परिसरमोसमी पाऊसशेतकरीदुष्काळ