Lokmat Agro >हवामान > निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के, मुळा, भंडारदरा किती?

निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के, मुळा, भंडारदरा किती?

Now only 12.92 percent in Nilwande Dam, how much is Radish, Bhandardara? | निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के, मुळा, भंडारदरा किती?

निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के, मुळा, भंडारदरा किती?

एप्रिलच्या सुरुवातीला एवढा कमी पाणीसाठा शिल्लक असताना हा पाणीसाठा कसा पुरणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

एप्रिलच्या सुरुवातीला एवढा कमी पाणीसाठा शिल्लक असताना हा पाणीसाठा कसा पुरणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून तापमान ४० अंशांच्या वर गेले असून उष्णतेमुळे धरणात बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी धरणसाठा वेगाने खालावत असून निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

निळवंडे धरणात ३०.८१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून केवळ एक टीएमसी पाणी धरणात शिल्लक आहे. येत्या काळात उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे नुकतेच हवामान विभागाने दाखल केले. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला एवढा कमी पाणीसाठा शिल्लक असताना हा पाणीसाठा आणखी कमी होणार असून येणाऱ्या काळात आणखी पाण्याचे दुर्भीक्ष ओढावण्याची चिन्हे आहेत.

याशवाय अहमदनगरचे सर्वाधिक पाणीक्षमता असणाऱ्या मुळा धरणात आता ३५.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ७ टीएमसी पाणी उरले आहे. मुळा धरणात सध्या २१३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर  भंडारदरा धरणात ४३.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Web Title: Now only 12.92 percent in Nilwande Dam, how much is Radish, Bhandardara?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.