Join us

निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के, मुळा, भंडारदरा किती?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 03, 2024 10:53 AM

एप्रिलच्या सुरुवातीला एवढा कमी पाणीसाठा शिल्लक असताना हा पाणीसाठा कसा पुरणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यापासून तापमान ४० अंशांच्या वर गेले असून उष्णतेमुळे धरणात बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. परिणामी धरणसाठा वेगाने खालावत असून निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

निळवंडे धरणात ३०.८१ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून केवळ एक टीएमसी पाणी धरणात शिल्लक आहे. येत्या काळात उष्णतेच्या लाटा येणार असल्याचे नुकतेच हवामान विभागाने दाखल केले. त्यामुळे एप्रिलच्या सुरुवातीला एवढा कमी पाणीसाठा शिल्लक असताना हा पाणीसाठा आणखी कमी होणार असून येणाऱ्या काळात आणखी पाण्याचे दुर्भीक्ष ओढावण्याची चिन्हे आहेत.

याशवाय अहमदनगरचे सर्वाधिक पाणीक्षमता असणाऱ्या मुळा धरणात आता ३५.१३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून ७ टीएमसी पाणी उरले आहे. मुळा धरणात सध्या २१३ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर  भंडारदरा धरणात ४३.५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :धरणपाणीपाणी टंचाईअहमदनगर