Lokmat Agro >हवामान > मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी?

मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी?

Now only 20.55 percent dam storage in Marathwada, how many TMC in which dam including Jayakwadi? | मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी?

मराठवाड्यात आता केवळ २०.५५ टक्के धरणसाठा, जायकवाडीसह कोणत्या धरणात किती टीएमसी?

राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. देशभरात पाणीटंचाईचे सावट ...

राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले. देशभरात पाणीटंचाईचे सावट ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात एकीकडे कमालीची तापमानवाढ होत असताना मराठवाड्यातील धरणामंध्ये आता २०.५५ टक्के पाणीसाठा राहिल्याचे जलसंपदा विभागाने सांगितले.

देशभरात पाणीटंचाईचे सावट घोंगावत आहे. बंगलुरु शहरात तर आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील सहा महसूल विभागात सरासरी  ३९.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यात नागपूर ५०.१७%, अमरावती ५१.१९, नाशिक ३९.९९, पुणे ३९.८१, कोकण ५२.२३ तर औरंगाबाद विभागात २०.५५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे.

मराठवाड्यातील सर्वाधिक क्षमता असणाऱ्या जायकवाडी धरणात आता केवळ २२.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून (४९४.१८ दलघमी) १७.४ टीएमसी एवढा जिवंत पाणीसाठा उरला आहे. 

बीडच्या माजलगाव धरण शुन्यावर पोहोचले असून  मांजरा धरणात अर्धा टीएमसी पाणी शिल्लक आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरणात १८.१६ टक्के म्हणजेच ६.५१ टीएमसी तर येलदरी धरणात १५ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे.

नांदेडच्या निम्न मानारमध्ये ३२.१० टक्के पाणी शिल्लक असून १.५ टीएमसी एवढा धरणसाठा उरला आहे. धाराशिवच्या तेरणा धरणात ४.२४ टक्के म्हणजेच १.१९ टीएमसी पाणी राहिले असून इतर बहुतांश धरणे शुन्यावर जाऊन पोहोचली आहेत.

परभणीच्या निम्न दुधना धरणात ८.३९ टक्के म्हणजे शुन्य टीएमसी पाणी उरलं आहे. परिणामी नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागणार अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Web Title: Now only 20.55 percent dam storage in Marathwada, how many TMC in which dam including Jayakwadi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.