Join us

आज पूर्व विदर्भात दोन जिल्ह्यांत ऑरेंज तर ६ जिल्ह्यांना यलो अलर्ट

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 18, 2024 11:22 AM

बंगालच्या उपसागरावर ॲन्टी चक्राकार वारे घोंगावत असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम ...

बंगालच्या उपसागरावर ॲन्टी चक्राकार वारे घोंगावत असून विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम सरींचा पाऊस होण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामानाने वर्तवले आहे.पुढील दोन दिवसही विदर्भात पावसाची शक्यता असून गारपीटीचाही अंदाज देण्यात आला आहे.

विदर्भासह मराठवाड्यातही पाऊस व गारपीटीचा अंदाज देण्यात आला असून काल लातूरसह नांदेडला अलर्टही देण्यात आला होता. नांदेडमध्ये गारपीट झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले.

आज कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट

आज पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.

अमरावती, यवतमाळ,वर्धा, नागपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.

टॅग्स :पाऊसगारपीटहवामानतापमान