Lokmat Agro >हवामान > पंचगंगेने दिला महापुराचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाचा सविस्तर

पंचगंगेने दिला महापुराचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाचा सविस्तर

Panchaganga River has warned of floods, water storage of major dams in Kolhapur district, read in detail | पंचगंगेने दिला महापुराचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाचा सविस्तर

पंचगंगेने दिला महापुराचा इशारा, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाचा सविस्तर

पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

पावसाचा जोर कमी झाला असला तरीही अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पंचगंगेने सकाळी पावणेअकरा वाजता इशारा पातळी (४० फूट) ओलांडली. तब्बल ७८ बंधारे आणि ३८ मार्गावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धरण क्षेत्रात अद्याप पाऊस सुरू आहे.

राधानगरी धरण ८५ टक्के भरले असून, त्यातून प्रतिसेकंद १४५० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यात 'वारणा' धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून, पाणी सांडव्यापर्यंत पोहोचल्याने 'वारणा' नदीतील विसर्गही वाढल्याने पावासाचा जोर कमी झाला असला तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रविवारी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले होते. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून-मधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रात मात्र अद्याप पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे.

दृष्टिक्षेपात सोमवारचा पाऊस
४५ मि.मी. सरासरी पाऊस
७८ बंधारे पाण्याखाली
४० फूट पंचगंगा पातळी

धरणातील पाणीसाठा, टीएमसीमध्ये; कंसात क्षमता
राधानगरी ६.९१ (८.३६)
तुळशी २.४८ (३.४७)
वारणा २६.८१ (३४.३९)
दूधगंगा १५.६३ (२५.३९)
कासारी १.९९ (२.७७)
कडवी २.५१ (२.५१)
कुंभी १.८२ (२.७१)
पाटगाव ३.१९ (३.७१)
चिकोत्रा ०.८६ (१.५२)
चित्री १.७४ (१.८६)
जंगमहट्टी १.९२(१.२२)
घटप्रभा १.५६ (१.५६)
जांबरे ०.८२ (०.८२)
आंबेओहोळ १.२४ (१.२४)
सर्फनाला ०.४८ (०.६७)
कोदे ०.२१ (०.२१)

अधिक वाचा: Ujani Dam Water Level: उजनी धरण लवकरच प्लसमध्ये येणार

Web Title: Panchaganga River has warned of floods, water storage of major dams in Kolhapur district, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.