राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वेगाने घसरत असून नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डिंभे धरणात 1.61% पाणीसाठा शिल्लक राहिला असून चाकसमान धरण 6.70 टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे.
राज्यात मान्सूनची चाहूल लागली असली तरी राज्यभरात पावसाची व्याप्ती होऊन धरणे भरण्यास अवकाश आहे. राज्यात बहुतांश धरणांमधील पाणीसाठा दहा टक्क्यांच्याही खाली आहे. टँकरचे प्रमाण वाढले आहे. वाड्या वस्त्यांमध्ये पाणी येणं बंद झालं आहे. मराठवाड्यानंतर पुणे विभागातील धरण साठा हा राज्यात सर्वात कमी असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. आज दिनांक पाच जून रोजी पुण्यातील भाटघर धरणात 5.60% तर पवना धरणात 19.69% पाणीसाठा आता शिल्लक राहिला आहे.
पुण्यातील लघु मध्यम व मोठ्या 22 धरणांमध्ये किती पाणीसाठा राहिला आहे ? पहा ..१) नीरा देवघर 8.26२)डिंभे 1.61३)भामा आसखेड 15.80४)केडगाव 39.28%५)चाकसमान 6.70६) पिंपळगाव जोगे 0७) वडज 5.56८)माणिक डोह 1.86९)घोड चिंचणी 010) पवना 19.6911) भाटघर 5.6012) खडकवासला 50.6313) पानशेत 14.7114) वरसगाव 14.8215) गुंजवणी 14.7316) टेमघर 2.6317) मुळशी टाटा 12.4318) लोणावळा टाटा 019) वळवंटाटा ते 33.0520) चिरवटा टाटा 38.1021) ठोकरवाडी टाटा 42.7122) कुंडली टाटा 47. 89