Join us

Pune Dam Water Storage: पुण्यातील धरणांमध्ये उरलाय एवढा पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 19, 2024 12:50 PM

पुण्यात भाटघर धरणात ९.८५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. उर्वरित धरणांमध्ये राहिलंय एवढं पाणी..

राज्यातील धरणसाठा वेगाने घटत असताना मराठवाड्यासह आता पुण्यातील पाणीसाठाही घटत असून पुणे विभागातील एकूण ७२० धरणांमध्ये आज १८.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

पुण्यात भाटघर धरणात ९.८५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. पुण्यातील ६६५.५७ दलघमी उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता असून मागील वर्षी १३.६८ टक्के असणारा पाणीसाठा यंदा ९.१८ टक्के पाणी उरले आहे.

मुळशी टाटा धरणात २१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर निरा देवघर धरणात १४.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. चाकसमान धरणात ७.१६ टक्के पाणीसाठा उरला असून पानशेत धरणात १९ टक्के पाणी शिल्लक राहिला आहे.

राज्यात सध्या अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने हवामान ढगाळ असले तरी तापमान चढेच असल्याचे पहायला मिळत आहे. परिणामी बाष्पीभवनाचा वेग वाढला असून धरणसाठा वेगाने घसरत आहे.

पवना धरणात २३.५२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर डिंभे धरणात ९.८५ टक्के पाणीसाठा उरला आहे. जलसंपदा विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार पुणे विभागातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पुणे विभागात आज दि १९ मे रोजी १८.८८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत २२.३४ टक्के एवढा होता.

टॅग्स :पुणेधरणपाणी