Join us

Pune Flood Updates : पुणे जिल्ह्यातील मोठ्या धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 5:48 PM

Pune Flood Updates : भाटघर, निरा देवघर, गुंजवणे, मुळशी, पानशेत, वरसगाव, पवना, खडकवासला, वीर या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. तर पुणे जिल्ह्यातील मुळशी, खडकवासला आणि पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग केला तर पुणे शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. 

Pune Flood Updates : पुणे जिल्हा आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत असून पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडील धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे भाटघर, निरा देवघर, गुंजवणे, मुळशी, पानशेत, वरसगाव, पवना, खडकवासला, वीर या धरणांतून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. तर पुणे जिल्ह्यातील मुळशी, खडकवासला आणि पानशेत धरणातून पाण्याचा विसर्ग केला तर पुणे शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. 

दरम्यान, आज घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर धोधो पडणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असून सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला असून पुराच्या पाण्यात न जाण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत.

कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग? (ही आकडेवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेपर्यंतची आहे.)मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीपात्रात सुरू असलेला १८ हजार ४७४ क्युसेक्स विसर्गामध्ये वाढ करुन दूपारी ३ वाजता २० हजार १७७ क्युसेक्स करण्यात येणार आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी अशी सूचना बसवराज मुन्नोळी (हेड- डॅम्स, इस्टेट आणि ॲडव्होकसी टाटा पॉवर, मुळशी) यांनी केल्या आहेत.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून  मुठा नदीपात्रात होणार विसर्ग वाढवून दुपारी १२ वाजता २७ हजार १६ क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग  कमी/जास्त करण्याची शक्यता आहे.

भाटघर धरणाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असून धरण १०० टक्के भरले आहे. नदीपात्रात सुरू असणाऱ्या १३ हजार ५३१ क्युसेकमध्ये वाढ करुन दुपारी ३ वाजता विद्युत निर्मिती केंद्राद्वारे १ हजार ६३७ आणि सांडव्याद्वारे १४ हजार क्युसेक असा एकूण १५ हजार ६३१ क्युसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :हवामानपाऊसमोसमी पाऊसपूर