Lokmat Agro >हवामान > Pune Rain : पुणे जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत किती पडेल पाऊस? हवामान विभागाने दिले 'हे' इशारे

Pune Rain : पुणे जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत किती पडेल पाऊस? हवामान विभागाने दिले 'हे' इशारे

Pune Rain How much rain will fall in Pune district till August 20 Meteorological department issued 'he' warnings | Pune Rain : पुणे जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत किती पडेल पाऊस? हवामान विभागाने दिले 'हे' इशारे

Pune Rain : पुणे जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत किती पडेल पाऊस? हवामान विभागाने दिले 'हे' इशारे

Pune Monsoon Rain : पुणे जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत किती मिमी पाऊस पडेल आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भातील माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.

Pune Monsoon Rain : पुणे जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत किती मिमी पाऊस पडेल आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी यासंदर्भातील माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Pune Rain Updates : पुणे जिल्ह्यांत यंदाचा मान्सूनचा पाऊस चांगलाच बरसला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. तर मागील एका आठवड्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. येणाऱ्या एका आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यात कुठे आणि किती पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला आहे. 

मागील आठवडयाचे हवामान
पुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २७० ते ३९.६ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २१.६ ते २२.१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ८७ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ३.६ ते ५.३ कि.मी. होता.

किती पडेल पाऊस?
पुणे जिल्ह्यात १७ ऑगस्ट रोजी १३ मिली, १८ ऑगस्ट रोजी २० मिली, १९ ऑगस्ट रोजी २८ मिली, २० ऑगस्ट रोजी ३५ मिली आणि २१ ऑगस्ट रोजी ४० मिली पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील पाच दिवसांत पुणे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत जाणार असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे. 

हवामान अंदाज
पुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी १३ ते १८ कि.मी. दरम्यान राहील. आकाश ढगाळ ते पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋतेकडून ईशान्येकडे राहील.

Web Title: Pune Rain How much rain will fall in Pune district till August 20 Meteorological department issued 'he' warnings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.