Pune Rain Updates : पुणे जिल्ह्यांत यंदाचा मान्सूनचा पाऊस चांगलाच बरसला आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत. तर मागील एका आठवड्यापासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. येणाऱ्या एका आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यात कुठे आणि किती पाऊस पडेल याचा अंदाज वर्तवला आहे.
मागील आठवडयाचे हवामानपुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २७० ते ३९.६ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २१.६ ते २२.१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ८७ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ३.६ ते ५.३ कि.मी. होता.
किती पडेल पाऊस?पुणे जिल्ह्यात १७ ऑगस्ट रोजी १३ मिली, १८ ऑगस्ट रोजी २० मिली, १९ ऑगस्ट रोजी २८ मिली, २० ऑगस्ट रोजी ३५ मिली आणि २१ ऑगस्ट रोजी ४० मिली पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील पाच दिवसांत पुणे जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण हळूहळू वाढत जाणार असल्याचं यावरून स्पष्ट होत आहे.
हवामान अंदाजपुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी १३ ते १८ कि.मी. दरम्यान राहील. आकाश ढगाळ ते पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋतेकडून ईशान्येकडे राहील.