Pune Rain : राज्यभरातील मान्सूनचा पाऊस आता शेवटच्या टप्प्यात आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस यंदा झाला असल्यामुळे येणाऱ्या वर्षभरात पाण्याचा तुटवडा भासणार नसल्याची शक्यता आहे. तर आता हळूहळू पावसाचा जोर कमी होत असून महाराष्ट्रात परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.
पुण्यात उद्यापासून पावसाचे प्रमाण स्थिर राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे जिल्ह्यामध्ये ५ ऑक्टोबर रोजी ८ मिमी, ६ ऑक्टोबर रोजी ४ मिमी, ७ ऑक्टोबर रोजी ३५ मिमी, ८ ऑक्टोबर रोजी १५ मिमी आणि ९ ऑक्टोबर रोजी ५ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजे केवळ ७ ऑक्टोबर रोजी जास्त पावसाची पुण्यात शक्यता आहे. कमाल तापमान हे ३३ ते ३५ अंशाच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.
पुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २८.० ते ३४.९ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २०.६ ते २३.६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ७७ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी १.६ ते ४.७ क.मी. होता
पुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ०८ ते १२ क.मी. दरम्यान राहील. आकाश ढगाळ राहील. वा-याची दिशा आग्नेयेकडून वायव्येकडे राहील.