Lokmat Agro >हवामान > Pune Rain : पुण्यात पुढच्या ५ दिवसांत किती पडणार पाऊस? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

Pune Rain : पुण्यात पुढच्या ५ दिवसांत किती पडणार पाऊस? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

Pune Rain: How much rain will fall in Pune in the next 5 days? What should farmers be careful about? | Pune Rain : पुण्यात पुढच्या ५ दिवसांत किती पडणार पाऊस? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

Pune Rain : पुण्यात पुढच्या ५ दिवसांत किती पडणार पाऊस? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

राज्यातील विविध भागांत मान्सूनचा पाऊस बरसताना दिसत आहे.

राज्यातील विविध भागांत मान्सूनचा पाऊस बरसताना दिसत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मान्सूनने राज्यातील सर्व भागांत हजेरी लावली असून शेतकरी पेरण्यांच्या कामात व्यस्त आहेत. मान्सूनचा पाऊसही आता स्थिरावला असून राज्यातील विविध भागांत मान्सूनचा पाऊस बरसताना दिसत आहे. तर पुणे जिल्ह्यांत पुढील पाच दिवसांत म्हणजे २६ ते ३० जून दरम्यान १६ ते ३५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

दरम्यान, हवामान विभागाच्या माहितीनुसार २६ जून रोजी पुणे जिल्ह्यात १६ मिमी, २७ जून रोजी २० मिमी, २८ जून रोजी २४ मिमी,२९ जून रोजी ३५ मिमी आणि ३० जून रोजी १९ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसाच्या अंदाजावरून शेतकऱ्यांनी आपापली खरिपातील शेतीची कामे आवरून घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?

  • घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता असल्याने शेतातील पावसाच्या पाण्याची निचऱ्याची व्यवस्था करावी
  • पक्व झालेल्या फळांची काढणी करावी
  • शेतमालाची योग्य ठिकाणी साठवणूक करावी
  • उघड्यावरील धान्य सुरक्षित स्थळी ठेवावे
  • पावसाचा अंदाज बघून पिकांवर बुरशीनाशक, कीटकनाशक यांची फवारणी करावी

दरम्यान, काही भागांत अजूनही पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत अशा भागांतील शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय लागवडी करू नयेत. घाई केल्यास दुबार पेरणीचं संकट ओढावू शकतं.

Web Title: Pune Rain: How much rain will fall in Pune in the next 5 days? What should farmers be careful about?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.