Join us

Pune Rain : पुढील पाच दिवसांत पुण्यात किती पडणार पाऊस? काय आहेत हवामान विभागाचे इशारे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 8:03 PM

Pune Rain : पुण्यातील पुढील पाच दिवसांत किती पाऊस पडणार यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Pune Rain : पुणे जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला चांगल्या पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचं दिसून येत आहे. तर हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत म्हणजे ७ सप्टेंबरपासून ११ सप्टेंबरपर्यंत पुणे जिल्ह्यात किती पाऊस पडणार याचा अंदाज जाहीर केला आहे. (Pune Rain Latest Updates)

मागील आठवडयाचे हवामानपुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २६.४ ते २९.४ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २१.७ ते २३.१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ८३ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ३.४ ते ७२ क.मी. होता.

हवामान अंदाजपुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी १८ ते १९ क.मी. दरम्यान राहील. आकाश ढगाळ ते पूर्णतः ढगाळ राहील. वा-याची दिशा नैऋतेकडून ईशान्येकडे राहील.

किती पडणार पाऊस?पुणे जिल्ह्यात पुढील पाच दिवसातील पावसाचा विचार केला तर ७ सप्टेंबर रोजी २० मिमी, ८ सप्टेंबर रोजी ५० मिमी, ९ सप्टेंबर रोजी ५० मिमी, १० सप्टेंबर रोजी ३५ मिमी आणि ११ सप्टेंबर रोजी १५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तापमान हे ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :हवामानपाऊसशेतकरी