Pune Weather Updates : पुणे परिसरामध्ये मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला असून येणाऱ्या पाच दिवसांत म्हणजे १० जुलै ते १४ जुलै दरम्यान चांगला पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सामान्य नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
मागील आठवड्याचे हवामान पुणे परिसरात मागील आठवड्याचे कमाल तापमान २९.४ ते ३०.१ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २१.७ ते २४.२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७५ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ३.६ ते ७६ किमी होता.
हवामान अंदाजपुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६९ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी १७ ते २५ क.मी. दरम्यान राहील. आकाश ढगाळ ते पूर्णतः ढगाळ राहील. वा-याची दिशा नैऋतेकडून ईशान्येकडे राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
कोणत्या दिवशी किती पडणार पाऊस?
- १० जुलै - ४० मिमी
- ११ जुलै - २० मिमी
- १२ जुलै - २२ मिमी
- १३ जुलै - २८ मिमी
- १४ जुलै - ३८ मिमी