Pune Latest Rain Updates : राज्यात सध्या मान्सूनचा चांगला पाऊस पडत असून दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. पुण्यात पडलेल्या पावसाने शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा आणि पवना नदीला चांगला पूर आला होता. या पुरामध्ये अनेक लोकांना काही काळासाठी स्थलांतर करावे लागले असून अनेकांच्या गाड्या, कार आणि घराचे नुकसान झाले आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यात किती पाऊस पडणार याची आकडेवारी हवामान विभागाने जाहीर केली आहे.
मागील आठवडयाचे हवामान
पुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २४.० ते २८.२ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २१.४ ते २३.० अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७९ ते ९७ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ४.७ ते ६.८ कि.मी. होता.
पुण्यात पुढील पाच दिवसांत किती पडणार पाऊस?
हवामान विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार आज (२७ जुलै) रोजी ४५ मिमी, २८ जुलै रोजी ३५ मिमी, २९ जुलै रोजी २५ मिमी, ३० जुलै रोजी २४ मिमी आणि ३१ जुलै रोजी २८ मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर या पाच दिवसांमध्ये किमान तापमान हे २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता असून कमाल तापमान हे २८ ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
हवामान अंदाज
पुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान २८ ते ३१ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८१ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी २१ ते २८ कि.मी. दरम्यान राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वा-याची दिशा नैऋतेकडून ईशान्येकडे राहील.