Pune Latest Rain Updates : मान्सूनचा पाऊस राज्यभरात बरसत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस झाला असून शेतीच्या कामाला वेग आला आहे. दरम्यान, अजूनही राज्यातील बऱ्याच भागांत पुरेसा पाऊस नसल्याचं शेतकरी सांगत आहेत. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जरी चांगला पाऊस झाला असला तरी दरवर्षीच्या तुलनेत भातलागवडीसाठी कमी पाऊस झाला आहे. तर येणाऱ्या पाच दिवसांत पुणे जिल्ह्यांत पाऊस कसा असेल यासंदर्भातही हवामान विभागाने अंदाज वर्तवले आहेत.
मागील आठवड्याचे हवामानपुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २६.६ ते ३१.६ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २१.८ ते २३.४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९५ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ९३ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ४.१ ते ६.९ क.मी. होता.(Pune District rain Updates)
हवामान अंदाजपुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी २४ ते ३० क.मी. दरम्यान राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. वा-याची दिशा नैऋतेकडून ईशान्येकडे राहील.
किती पडणार पाऊस?येणाऱ्या पाच दिवसांत म्हणजे १७ जुलै ते २१ जुलै दरम्यान पुणे जिल्ह्यांत २४ मिमी ते ४५ मिमी पर्यंत प्रतिदिन पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १७ जुलै रोजी २४ मिमी, १८ जुलै रोजी २८ मिमी, १९ जुलै रोजी ३० मिमी, २० जुलै रोजी ३५ मिमी आणि २१ जुलै रोजी ४५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० अंशापर्यंत असण्याची शक्यता आहे.