Pune Weather Updates : पुणे जिल्ह्यांत पुढील पाच दिवसांत चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून तापमानबी २६ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस भात उत्पादक शेतकऱ्यांना फायद्याचा असून पुणे जिल्ह्याच्या मध्य पूर्व भागांत अजूनही म्हणावा तितका पाऊस पडला नसल्याचे चित्र आहे. पुरंदर तालुक्यातील अनेक गावांत नदी, नाल्यांत पाणी साचले नसल्याची परिस्थिती आहे.
मागील आठवडयाचे हवामान
पुणे परिसरात मागील आठवडयात कमाल तापमान २४.० ते २७९ अंश सेल्सिअस तर कमान तापमान २१.४ ते २३.४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७९ ते ९७ टक्के होती. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी ३.३ ते १०.० कि.मी. होता.
हवामान अंदाज
पुढील पाच दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान २६ ते २७ अंश सेल्सिअस, तर कमान तापमान २१ ते २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८६ टक्के दरम्यान राहील. वाऱ्याचा सरासरी वेग ताशी २२ ते २४ कि.मी. दरम्यान राहील. आकाश ढगाळ ते पूर्णतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैऋतेकडून ईशान्येकडे राहील.
किती पडेल पाऊस?
पुणे जिल्ह्यातील पुढील पाच दिवसांचा विचार केला तर ३१ जुलै रोजी ५२ मिमी, १ ऑगस्ट रोजी ४९ मिमी, २ ऑगस्ट रोजी ८० मिमी, ३ ऑगस्ट रोजी ९५ मिमी आणि ४ ऑगस्ट रोजी १०० मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसांत पुणे जिल्ह्यांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायद्याचा असून पुरंदर आणि पूर्व पुणे जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा आहे.