Join us

Radhanagari Dam Water : कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान असणाऱ्या राधानगरी धरणामध्ये किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 10:18 IST

धानगरी व कळम्मावाडी ही दोन्ही धरणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहेत. सध्या राधानगरी धरणात ५६.८८ टक्के, म्हणजेच १२५.१२ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

गौरव सांगावकरराधानगरी : राधानगरी व कळम्मावाडी ही दोन्ही धरणे कोल्हापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरली आहेत. सध्या राधानगरी धरणात ५६.८८ टक्के, म्हणजेच १२५.१२ दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, गतवर्षी याच दिवसांत धरणात ८८. ११ दलघमी (३.११ टी.एम.सी.) साठा होता.

यंदा जवळपास ४.४२ टी.एम.सी. पाणीसाठा उपलब्ध असून, गतवर्षीच्या तुलनेत राधानगरी धरणात १.३१ टीएमसी पाणी जास्त आहे.

यावर्षी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. गत आठवड्यात वळीव पावसामुळे नदी, बंधारे भरून वाहत आहेत. त्यामुळे मागील आठ दिवसांपासून धरणातून नदीत होणारा विसर्ग बंद आहे.

उन्हाळा संपल्यानंतर धरणातून भोगावती नदीपात्रता विसर्ग वाढविला जातो. यामुळे पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती नियंत्रणात येण्यास मदत होते.

तुळशी जलाशयामुळे धामोड खोऱ्यातील शेतीला मिळणाऱ्या मुबलक पाण्यामुळे ही गावे आर्थिकदृष्ट्या भक्कम होत आहेत. तुळशी जलाशयात ६५.२२ टक्के पाणी असून, २.१२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

तर कळमवाडी धरणात गळती दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ७.८९ टीएमसी म्हणजेच २२३.५३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, धरणात केवळ ३२ टक्के पाणी आहे. यामुळे एप्रिल व मे महिन्यात दूधगंगा नदीचे पाणी जपून वापरावे लागणार आहे.

अधिक वाचा: सीडलेस काकडीचा प्रयोग; दोन महिन्यात शेतकरी चंद्रकांत यांना लाखांवर नफा; वाचा सविस्तर

टॅग्स :धरणपाणीकोल्हापूरनदीपाणीकपात