Lokmat Agro >हवामान > Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Radhanagari Dam Water Level : Heavy rains in Kolhapur again opened four gates of Radhanagari Dam | Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Radhanagari Dam Water Level : कोल्हापुरात पुन्हा दमदार पाऊस राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

Radhanagari Dam कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत.

Radhanagari Dam कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरीधरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. सर्वच धरणांतून विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

पंचगंगेची पातळी दिवसभरात अडीच फुटाने वाढली असून २० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. शनिवारी रात्रभर जोरदार पाऊस कोसळला. रविवारी सकाळी काही काळ उसंत घेतली, पण अकरापासून पुन्हा जोर पकडला.

गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी तालुक्यांत जोर अधिक आहे. कोल्हापूर शहरातही पाऊस असल्याने सगळीकडे पाणी झाले आहे. आठवडा सुट्टी, त्यात पाऊस असल्याने शहरातील अनेक रस्ते ओस पडल्यासारखे दिसत होते.

रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ३०.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस गगनबावडा, राधानगरी, भुदरगड़, आजरा, चंदगड, शाहूवाडी तालुक्यांत झाला आहे.

धरणक्षेत्रातही पाऊस अधिक असल्याने विसर्ग वाढला आहे. राधानगरी धरणाचे सुरुवातीला दोन आणि नंतर दोन, असे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, त्यातून प्रतिसेकंद ७२१२ घनफूट पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे. पंचगंगेची पातळी सकाळी आठ वाजता २०.६ फूट होती, दिवसभरात त्यात अडीच फुटांची वाढ झाली होती.

चार धरणक्षेत्रांत धुवाधार
घटप्रभा, पाटगाव, कोदे, कासारी या चार धरणक्षेत्रांत धुवाधार पाऊस कोसळला आहे. सरासरी ११० मिली मीटरपेक्षा अधिक पाऊस येथे झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. २० बंधारे पाण्याखाली गेले असून, पाऊस असाच राहिला, तर सोमवारी सकाळी पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडू शकते.

राधानगरीचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले
- शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. रविवारी पहाटे ५ वाजता सहा क्रमांकाचा दरवाजा उघडला.
तर, सकाळी ९ वाजून १३ मिनिटांनी दरवाजा क्रमांक पाच उघडला. सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी क्रमांक तीन व चार असे एकूण चार स्वयंचलित दरवाजे उघडले.
या चार दरवाजातून ५७१२ क्युसेक व विद्युत गृहातून १५०० क्युसेक असा एकूण ७२१२ क्युसेक विसर्ग सध्या भोगावती नदी पात्रात सुरू आहे. शनिवारी (दि.२४) ५९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा: Ujani Dam Water Level : उजनी धरणाची पाणीपातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीत मोठा विसर्ग

Web Title: Radhanagari Dam Water Level : Heavy rains in Kolhapur again opened four gates of Radhanagari Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.