Join us

Radhanagari Dam Water Update: राधानगरी धरणाचे चार दरवाजे सुरू; दोन बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 9:28 AM

धरणाचे चार दरवाजे खुले असून, शुक्रवारी पहाटे ५ वाजता एक क्रमांकाचे गेट उघडले होते, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने क्रमांक एकचा दरवाजा दुपारी १ वाजता बंद झाला.

राधानगरी : धरणाचे चार दरवाजे खुले असून, शुक्रवारी पहाटे ५ वाजता एक क्रमांकाचे गेट उघडले होते, दिवसभर पावसाने उसंत घेतल्याने क्रमांक एकचा दरवाजा दुपारी १ वाजता बंद झाला.

त्या पाठोपाठ संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी दरवाजा क्रमांक ३ बंद झाला असून, राधानगरीधरणाचे चार स्वयंचलित दरवाजे चालू आहेत. या चार दरवाज्यांतून ५७१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर राधानगरी धरणातील वीजनिर्मिती केंद्रातून १५०० क्युसेक विसर्ग असा ऐकून ७२१२ क्युसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात चालू आहे.

पाणी पातळी ३४७.०९ असून, ८२८२.७८ द. ल. घ. मी. पाणीसाठा शिल्लक आहे. आज दिवसभरात धरण क्षेत्रात ६५ मिमी पावसाची नोंद झाली असून, शुक्रवारी दिवसभर राधानगरीत पावसाचा जोर ओसरल्याने कोल्हापूकरांना दिलासा मिळाला असला, तरी धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पुन्हा वाढल्यास आणखी एक स्वयंचलित दरवाजा उघडू शकतो.

त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रवेश बंद असतानाही धरण पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी आम्हाला स्वयंचलित दरवाजे पाहण्यासाठी सोडण्यात यावे, यासाठी चौकीदार व सुरक्षा रक्षकांशी काही काळ हुज्जत घातली.

अधिक वाचा: Ujani Dam Water Level: उजनी धरणाची मोठी खबर धरण आलं प्लसमध्ये किती झाला पाणीसाठा

टॅग्स :धरणपाणीराधानगरीकोल्हापूरपाऊसनदी