Lokmat Agro >हवामान > Rain Alert : मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Rain Alert : मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Rain Alert : Yellow Alert in 'this' district of Marathwada; Chance of heavy rain with gusty winds | Rain Alert : मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

Rain Alert : मराठवाड्याच्या 'या' जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला असून, ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असतांना झाडाखाली किवा झाडाजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा.

ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकलपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातूचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफार्मजवळ थांबू नये. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा.

बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

..तर इथे करा संपर्क

आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना ०२४८२-२२३१३२ वर तसेच जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी केले आहे.

Web Title: Rain Alert : Yellow Alert in 'this' district of Marathwada; Chance of heavy rain with gusty winds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.