Lokmat Agro >हवामान > Rain :गंगापूरमधून विसर्ग; गणपती विसर्जनाला राज्यातील धरणांचा विसर्ग असा आहे

Rain :गंगापूरमधून विसर्ग; गणपती विसर्जनाला राज्यातील धरणांचा विसर्ग असा आहे

Rain : Discharge from Gangapur; Ganapati Visarjana means the dissolution of dams in the state | Rain :गंगापूरमधून विसर्ग; गणपती विसर्जनाला राज्यातील धरणांचा विसर्ग असा आहे

Rain :गंगापूरमधून विसर्ग; गणपती विसर्जनाला राज्यातील धरणांचा विसर्ग असा आहे

Rain : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही काल चांगला पाऊस पडल्याने अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. घाटघर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या धरण क्षेत्रांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

Rain : धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही काल चांगला पाऊस पडल्याने अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. घाटघर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या धरण क्षेत्रांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

काल दिनांक २७ सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. नाशिक, औरंगाबाद सह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही काल चांगला पाऊस पडल्याने अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. घाटघर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या धरण क्षेत्रांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.

आज दिनांक २८ रोजी सकाळी ६ च्या सुमारास राज्यातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात येत आहे. त्यात नाशिकमधील गंगापूर, भंडारदरा, गोसीखुर्द, नांदुरमध्यमेश्वर यांसारख्या धरणांचा समावेश आहे.

गंगापूरमधून विसर्ग असा होता
नाशिक शहर व परिसरासह गंगापूर धरण व पाणलोट क्षेत्रातसुद्धा बुधवारी (दि. २७) दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात दुपारी झालेल्या धुव्वाधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली अन् शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावत 'हॅट्रिक'' साधली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने २६.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

गोदावरी नदीला आलेला पूर (छायाचित्र :प्रशांत खरोटे, लोकमत)
गोदावरी नदीला आलेला पूर (छायाचित्र :प्रशांत खरोटे, लोकमत)

गंगापूर धरण व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे दुपारी ४ वाजता धरणातून थेट २,२७२ क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. हा विसर्ग रात्री ८ वाजता पुन्हा १.१३६ क्युसेकने वाढून एकूण ३,४०८ क्युसेक करण्यात आला. यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसून आली. रात्री दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागले होते. होळकर पुलाखालून रात्री १० वाजता रामकुंडात ७.८३० क्युसेक इतके पाणी प्रवाहित झाले होते.

आज सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणक्षेत्रातला आणि एकूण पाऊस व धरणांतून होणारा विसर्ग आपण जाणून घेऊ यात.

पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी(आज रोजी व आजपर्यंत एकूण) मिमि
घाटघर---   ०४८/६३७७,
रतनवाडी---   ०२३/५६७७
पांजरे----   ०१७/४२७२
वाकी----   ०१०/२५१३
भंडारदरा-   ०१३/३४५१
निळवंडे--   ०२७/६८१
मुळा-         ०००/४६५
आढळा---  ०२७/२२९ 
कोतुळ---   ०१२/४५३
अकोले---  ०३५/६२१
संगमनेर--  ०२१/३२२
ओझर-- ०१४/२४०
आश्वी--- ०१६/२५९
लोणी--- ०१६/२५३
श्रीरामपुर-- ०३९/३९७
शिर्डी---- ०३४/२४९
राहाता--- ०२९/२८७
कोपरगाव-- ०१३/३४४                              
राहुरी----- ०००/३४७
नेवासा--- ०००/४१३
अ.नगर-- ०००/३९२
नासिक-- ०३८/६११
त्रिंबकेश्वर--- ०२५/१६१४
इगतपुरी---- ०७५/३४३६
घोटी-----  ०००/०००
भोजापुर(धरण)-०२८/३३४
 गिरणा(धरण)-- ०००/२९३                              
हतनुर(धरण )--०००/६९७                                                
वाघुर (धरण)---०००/६२५                     
जायकवाडी(धरण)-- ००३/३०२
उजनी(धरण)---  ००२/३४४
कोयना( धरण)--- ००३/३९२७
महाबळेश्वर----  ००२/५३४५
नवजा----  ००२/५५५१

ध‌रणांतून होणारा विसर्ग (क्युसेक्स-दैनंदिन)

भंडारदरा धरण(प्रवरानदी)-- ८२०
     कालवे-------    ०००               
निळवंडे धरण(प्रवरा नदी)-२४१३ 
देवठाण(आढळा नदी)--४१०   
कालवे------०३०
भोजापुर(म्हाळुंगी)---९००     
कालवा-------६०
ओझर(प्रवरा नदी)-----१८९५
कोतुळ(मुळा नदी)--    १०६१               
गंगापुर----;--११३६     
कालव्याद्वारे----०००    
दारणा------४३१६/२७०८                                        
नां. मध्ममेश्वर(गोदावरी)--१७२३५
कालवे- (जलद कालव्यासह)---०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग-- ००००          
      
वीजनिर्मिती-               
नदीत सुरू असलेला विसर्ग-      
कालवे------०००
एकुण विसर्ग--,----००००
हतनुर(धरण)---    १६०६८
‌‌सीना(धरण)----  ००००     
घोड(धरण)-----     ००००.                                                   
डिंभे (धरण)----२०१२
उजनी ( धरण)---४,०००
राधानगरी-----१४००   
राजापुर बंधारा(कृष्णा)---१०९५०
कोयना(धरण)--     ००००                        
‌खडकवासला----      ००००.                                       
पानशेत-------०००                                                    
पवना( धरण) ----००००.                                              
कृष्णा पुल, कराड---१००४                              
गोसीखुर्द (वैनगंगा)---१९,८२९

संकलन :  हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.), जलसंपदा

Web Title: Rain : Discharge from Gangapur; Ganapati Visarjana means the dissolution of dams in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.