काल दिनांक २७ सप्टेंबर रोजी राज्यातील अनेक भागांत चांगला पाऊस झाला. नाशिक, औरंगाबाद सह अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही काल चांगला पाऊस पडल्याने अनेक धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. घाटघर, इगतपुरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर या धरण क्षेत्रांत चांगल्या पावसाची नोंद झाली आहे.
आज दिनांक २८ रोजी सकाळी ६ च्या सुमारास राज्यातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात येत आहे. त्यात नाशिकमधील गंगापूर, भंडारदरा, गोसीखुर्द, नांदुरमध्यमेश्वर यांसारख्या धरणांचा समावेश आहे.
गंगापूरमधून विसर्ग असा होतानाशिक शहर व परिसरासह गंगापूर धरण व पाणलोट क्षेत्रातसुद्धा बुधवारी (दि. २७) दिवसभर पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरात दुपारी झालेल्या धुव्वाधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली अन् शहरातील रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. सलग तिसऱ्या दिवशी पावसाने दुपारी जोरदार हजेरी लावत 'हॅट्रिक'' साधली. रात्री साडेआठ वाजेपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने २६.९ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
गंगापूर धरण व पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे दुपारी ४ वाजता धरणातून थेट २,२७२ क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. हा विसर्ग रात्री ८ वाजता पुन्हा १.१३६ क्युसेकने वाढून एकूण ३,४०८ क्युसेक करण्यात आला. यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली दिसून आली. रात्री दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागले होते. होळकर पुलाखालून रात्री १० वाजता रामकुंडात ७.८३० क्युसेक इतके पाणी प्रवाहित झाले होते.
आज सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणक्षेत्रातला आणि एकूण पाऊस व धरणांतून होणारा विसर्ग आपण जाणून घेऊ यात.
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी(आज रोजी व आजपर्यंत एकूण) मिमिघाटघर--- ०४८/६३७७,रतनवाडी--- ०२३/५६७७पांजरे---- ०१७/४२७२वाकी---- ०१०/२५१३भंडारदरा- ०१३/३४५१निळवंडे-- ०२७/६८१मुळा- ०००/४६५आढळा--- ०२७/२२९ कोतुळ--- ०१२/४५३अकोले--- ०३५/६२१संगमनेर-- ०२१/३२२ओझर-- ०१४/२४०आश्वी--- ०१६/२५९लोणी--- ०१६/२५३श्रीरामपुर-- ०३९/३९७शिर्डी---- ०३४/२४९राहाता--- ०२९/२८७कोपरगाव-- ०१३/३४४ राहुरी----- ०००/३४७नेवासा--- ०००/४१३अ.नगर-- ०००/३९२नासिक-- ०३८/६११त्रिंबकेश्वर--- ०२५/१६१४इगतपुरी---- ०७५/३४३६घोटी----- ०००/०००भोजापुर(धरण)-०२८/३३४ गिरणा(धरण)-- ०००/२९३ हतनुर(धरण )--०००/६९७ वाघुर (धरण)---०००/६२५ जायकवाडी(धरण)-- ००३/३०२उजनी(धरण)--- ००२/३४४कोयना( धरण)--- ००३/३९२७महाबळेश्वर---- ००२/५३४५नवजा---- ००२/५५५१
धरणांतून होणारा विसर्ग (क्युसेक्स-दैनंदिन)
भंडारदरा धरण(प्रवरानदी)-- ८२० कालवे------- ००० निळवंडे धरण(प्रवरा नदी)-२४१३ देवठाण(आढळा नदी)--४१० कालवे------०३०भोजापुर(म्हाळुंगी)---९०० कालवा-------६०ओझर(प्रवरा नदी)-----१८९५कोतुळ(मुळा नदी)-- १०६१ गंगापुर----;--११३६ कालव्याद्वारे----००० दारणा------४३१६/२७०८ नां. मध्ममेश्वर(गोदावरी)--१७२३५कालवे- (जलद कालव्यासह)---०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग-- ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग- कालवे------०००एकुण विसर्ग--,----००००हतनुर(धरण)--- १६०६८सीना(धरण)---- ०००० घोड(धरण)----- ००००. डिंभे (धरण)----२०१२उजनी ( धरण)---४,०००राधानगरी-----१४०० राजापुर बंधारा(कृष्णा)---१०९५०कोयना(धरण)-- ०००० खडकवासला---- ००००. पानशेत-------००० पवना( धरण) ----००००. कृष्णा पुल, कराड---१००४ गोसीखुर्द (वैनगंगा)---१९,८२९संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.), जलसंपदा