हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज दिला होता. पण राज्यात बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपच पाऊस झाला तर बराच भाग अजून प्रतीक्षेत आहे. तसेच हवामान विभागाने पुढील चार दिवसही राज्यातील अनेक भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला.
विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तर मराठवाड्यात हि ठिकठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
उर्वरित महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागातही ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.