मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सहा जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांच्या पुढे पाऊस झाला आहे. तर नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांची सरासरी अद्याप पूर्ण झालेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस आजवर ७९ टक्के झाला होता.
विभागाची वार्षिक सरासरी ६७९.५ मि.मी. असून, या तलुनेत ७२७.६ मि.मी. पाऊस झाला आहे. ४८.१ मि.मी. जास्त पाऊस झाला आहे. ३० सप्टेंबर ही नियमित पावसाळा संपण्याची तारीख आहे.
अद्याप परतीच्या पावसाला सुरुवात झालेली नाही. १५ सप्टेंबरनंतर परतीच्या पावसाचे अनुमान आहे.
जिल्हा | झालेला पाऊस |
छत्रपती संभाजीनगर | ११६% |
जालना | १२२% |
बीड | १२१% |
लातूर | १०१% |
धाराशिव | १०४% |
नांदेड | ९९% |
परभणी | ९८% |
हिंगोली | १०५% |
एकूण | १०७% |
मागच्या वर्षीच्या तुलनेत धरणांत दुप्पट जलसाठा
मागच्या वर्षी ११ सप्टेंबरपर्यंत मोठ्या धरणांमध्ये ४४.५८ टक्के जलसाठा होता. सध्या ८७.२९ टक्के जलसाठा आहे. जायकवाडीतून ९४३२ क्युसेक, निम्न दुधनामधून १०१६, पेनगंगामूधन ६८५, मानारमधून १६००, तर विष्णुपरीतून १६ हजार १०४ क्युसेक पाणी सोडले जात आहे.